पपई, लिंबूचे भाव वाढले : उर्वरित सर्व फळे स्थिर

पुणे- गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात पपई आणि लिंबाना मागणी वाढली आहे. शहरासह जिल्ह्यात आखाड पार्ट्या रंगू लागल्याने लिंबाला मागणी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढूनही मागणी जास्त असल्याने दोन्ही फळांच्या भावात दहा ते वीस टक्क्‌यांनी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व प्रकारच्या फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
रविवारी येथील फळबाजारात अननस 6 ट्रक, मोसंबी 30 टन, संत्री 2 टन, डाळींब 100 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबाची 6 ते 7 हजार गोणी, चिक्कू 400 डाग, पेरु 200 क्रेटस्‌, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबुज 10 ते 12 टेम्पो, सिताफळाची 6 टन, सफरचंद 3 ते 4 हजार बॉक्‍स, आंब्याची 1 ते दीड हजार बॉक्‍स इतकी आवक झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 50-130, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-200, (4 डझन ) : 40-80, संत्रा : ( 3 डझन) 150-300, (4 डझन) : 80-150, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 15-60, गणेश 5-20, आरक्ता 10-40. कलिंगड : 5-10, खरबुज : 10-25, पपई : 5-20, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-500, सिताफळ : 20-150, आंबा : चौसा (6 किलो) : 500-1000, लंगडा : 700-900, प्लम (5 ते 6 किलो) 500-700, नासपती (15 ते 16 किलो) 700-800, पिअर : 1000-1300, सफरचंद : सिमला (20 ते 25 किलो) : 2000-3000.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
19 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)