पन्नीरसेल्वम यांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा

चेन्नई : तामिळनाडूतील एआयडीएमके सरकार आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा  दिला आहे. या पक्षाच्या 11 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका द्रविड मुन्नेत्र कळघम या विरोधी पक्षाने सादर  केली होती. ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे बहुमत सिद्धतेची अग्निपरीक्षा पन्नीरसेल्वम यांना सोपी जाईल अशी शक्यता आहे. या 11 आमदारांमध्ये उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचाही समावेश होता.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत राजकीय पेचप्रसंग उद्भवला आहे. सध्या मुख्यमंत्रिपद पलानीस्वामी यांच्याकडे आहे. मात्र त्यांना जयललिता यांच्या साथीदार शशिकला यांचे पुत्र दिनाकरन यांचा विरोध आहे. दिनाकरन यांनी अद्रमुकमधून काही आमदार फोडले आहेत. अद्याप राज्यात शक्तीपरीक्षण झालेले नाही. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र या निकालानंतर शक्तीपरिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकने शक्तीपरिक्षणाची मागणी करतानाच 11 आमदारांच्या अपात्रतेचीही मागणी केली होती. तथापि, ती स्वीकारण्यात आलेली नाही. त्यामुळे हे 11 आमदार सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास सक्षम असतील. बहुमतासाठी 122 चे बळ असणे आवश्यक आहे. या 11 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना साहाय्य केल्यास सरकार टिकण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)