पनामा प्रकरणात चौहान पुत्राचा उल्लेख गैरसमजूतीतून : राहुल गांधी

इंदूर: आपल्याकडून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुत्राचा संबंध पनामा पेपर्स प्रकरणाशी गैरसमजूतीतून जोडला गेला, असे स्पष्टिकरण कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. चौहान यांच्या पुत्राचा संबंध पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडला गेल्याने शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय चौहान यांनी राहुल गांधींविरोधात भोपाळ न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल केला आहे. त्यावरून गांधी यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.

“निवडणूकीच्या प्रचारासाठी आपण सध्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे दौरे करत आहोत. या तिन्ही ठिकाणी सत्तारुढ भाजपने एवढा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केला आहे की आपला गैरसमज झाला.’ असे ते म्हणाले.
“मामाजी (मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान) यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर प्रकरणात आले आहे. मात्र त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही.’ असा आरोप सोमवारी मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केला होता. चौहान यांचे पुत्र कार्तिकेयन यांनी त्वरित हा दावा फेटाळून लावला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता परिषदेने 2016 साली “पनामा पेपर्स’ म्हणून ओळखली जाणारी 11.5 दशलक्ष कागदपत्रे उघड केली होती. त्यात पनामात गुंतवणूक, मालमत्ता आणि कंपन्या असलेल्या शेकडो बड्या व्यक्‍तींचा उल्लेख होता. यावरून जगभर मोठी खळबळ माजली होती.

पनामा पेपर लीक प्रकरणी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा कोणताही सहभाग नव्हता, असे स्पष्टिकरण राहुल गांधी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. मात्र व्यापमं आणि ई निविदा यासारख्या गैरव्यवहाराच्या अन्य प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता, असा आरोपही राहुल गांधी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)