पनवेलजवळ भीषण अपघातात तीन जण ठार

पनवेल: पनवेलजवळ एका नादुरुस्त कारला धक्का मारत असताना टेम्पोने दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक कार बंद पडली होती. त्यामुळे कारमधील काही जण या कारला धक्का मारून बाजुला नेत होते. तेवढ्यात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारला धक्का मारणाऱ्यांपैकी तिघे जण जागीच ठार झाले. इतर तिघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)