पद्म पुरस्कारासाठी 1200 हून अधिक नामांकन प्राप्त

नवी दिल्ली – 2019च्या  प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी आतापर्यंत 1200हून अधिक नामांकन प्राप्त झाले आहेत. या पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन शिफारस करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. या संकेतस्थळावर 1654 रजिस्ट्रेशन झाली असून त्यापैकी 1207 नामांकनाच्या शिफारसी पूर्ण झाल्या आहेत. ही प्रक्रिया मे 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश भारत रत्न आणि पद्म विभूषण सन्मानप्राप्त व्यक्ती यासह इतर स्रोतांकडून पद्म पुरस्कारासाठी नामांकने मागवण्यात आली आहेत. www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलद्वारेच नामांकन/शिफारसी स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी सर्व नागरिक स्वत:च्या नामांकनासह इतरांसाठीही शिफारस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)