पद्मिनी, हरिका उपउपान्त्यपूर्व फेरीत

तेहरान, दि. 17 – ग्रॅंडमास्टर द्रोनावली हरिका आणि आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राउत यांनी दुसऱ्या फेरीत टायब्रेकरमध्ये ऐतिहासिक विजय मिळवताना जागतिक महिला चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी सामन्यात टायब्रेकरमध्ये बरोबरी केल्यानंतर निर्धारित वेळेत हारिकाने शानदार कामगिरी करताना विजयाची नोंद केली. तिने कझाकिस्तानच्या दीनारा सदुकासोव्हा हिच्याविरुद्ध विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये चमकदार कामगिरी हरिकाने बरोबरी केली. तर परतीच्या लढतीत हरिकाने प्रतिस्पर्धी दीनाराला पराभूत करताना पुढच्या फेरीत स्थान मिळवले.
दरम्यान पद्मिनी राउतला दुसऱ्या फेरीत खडतर आव्हानाला समोरे जावे लागले. यामध्ये माजी ज्युनियर जगज्जेती आणि आठवी मानांकित चीनच्या झाओ झेऊ हिने पद्मिनीला चांगलेच झुंजविले. त्यामुळे पद्मिनी दडपणाखाली आली होती. परंतु पद्मिनीने बाजी उलटवताना पहिला गेम जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निर्विवाद वर्चस्व राखून पद्मिनीने स्पर्धेच्या अंतिम सोळा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
पुढच्या फेरीत हरिकासमोर जॉर्जियाच्या सोपिको गुरामिश्‍विलीचे आव्हान आहे. तर उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेली पद्मिनी चीनच्या तान झोंगयी हिच्याशी झुंजणार आहे.
इतर लढतीत टायब्रेकरमध्ये निकाल लागलेल्या संघर्षपूर्ण लढतीत 3-3 अशा बरोबरीनंतर निर्णायक सातव्या गेममध्ये बाजी मारताना चीनच्या झोंगयी हिने चीनच्याच गतविजेती ऍना उशेनिनाचे आव्हान संपुष्टात आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)