पद्मिनी कोल्हापूरे करणार बॉलीवूडमध्ये कमबॅक

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे लवकरच बॉलीवूडमध्ये आपले पुनरागमन करणार आहे. 80 च्या दशकात तिने हिंदी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यानंतर बराच काळ ती सिनेसृष्टीपासून दूर होती. आता आशुतोष गोवारिकरच्या “पानिपत द ग्रेट बॅटल’ या ऐतिहासिक सिनेमातून ती कमबॅक करत आहे. या सिनेमात नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारत आहे.

गोपिका बाई या वाईच्या भिकाई नाईक रास्ते यांच्या कन्या होत्या. त्यांच्या लहानपणीच त्यांनी धार्मिक कर्मकांड आणि उपासतापास बघितले होते. नाना साहेबांची पत्नी झाल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सौख्य आणि सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारीच स्वीकारली होती. आपला पुत्र विश्‍वासराव पुढील पेशवा बनावा अशी गोपिका बाईंची महत्त्वाकांक्षा होती. काहीशी आत्मकेंद्री अशी ही व्यक्तिरेखा आहे. या रोलमध्ये पद्मिनी कोल्हापूरे खूपच परफेक्‍ट आहे, असे या सिनेमाच्या निर्मात्या सुनिता गोवारीकरनी सांगितले.

-Ads-

“पानिपत’ हा पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारलेला सिनेमा असेल. 14 जानेवारी 1761 साली झालेल्या या लढाईला मराठ्यांच्या इतिहासामध्ये विशेष महत्त्व आहे. मराठे आणि अहमदशाह अब्दालीमधील या लढाईमध्ये मराठ्यांची एक अख्खी पिढी गारद झाली असे म्हणतात. या लढाईच्या इतिहासावर कादंबरी, नाटक आणि सिरीयलही होऊन गेल्या आहेत. ऐतिहासिक विषय हाताळण्याचे विशेष कसब असलेल्या आशुतोष गोवारीकरची “जोधा अकबर’नंतरची ही आणखी एक ऐतिहासिक कलाकृती असणार आहे. यातून पद्मिनी कोल्हापूरेचे कमबॅक होणे ही निश्‍चितच विशेष बाब आहे.

बालकलाकार आणि नंतर मेन स्ट्रीम अॅक्‍टर म्हणून एक काळ गाजवलेली पद्मिनी कोल्हापूरे महेश कोठारेच्या “चिमणी पाखरं’नंतर पुन्हा गायब झाली होती. 2013 साली “फटा पोस्टर निकला हिरो’ या सिनेमात शाहीद कपूरच्या आईच्या भूमिकेत ती दिसली होती. तसेच “मंथन” या मराठी सिनेमातही तिची प्रमुख भूमिका होती. सिल्व्हर स्क्रीनवर “कमबॅक’च्या “पानिपत’ या सिनेमात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)