पद्मावत प्रमाणे इंदु सरकारला पाठींबा मिळाला नाही – मधूर भांडारकर

पद्मावत सिनेमाला झालेल्या विरोधावर मधूर भांडारकरांनी आपली खंत व्यक्त केली आहे. आपल्याला कोणीच पाठिंबा दिला नाही अस एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आयोजित एका मुलाखतीत ते म्हणाले.नुकताच प्रदर्शित झालेला पद्मावती हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर करणी सेनेने प्रचंड टीका केली असून त्याला प्रचंड विरोध होतो आहे.

पण पद्मावतीच्या मागे सारी चित्रपट सृष्टी खंबीरपणे उभी राहिली आहे. पण काही दिवसांपूर्वी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला इंदु सरकार हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमालाही त्यावेळी प्रचंड विरोध झाला होता. पण तेव्हा सिनेसृष्टी मधुर भांडारकरच्या मागे उभी राहिली नाही अशी खंतच मधुर भांडारकरने व्यक्त   केली आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी सिनेमांना झालेल्या वादावरही भाष्य केलं. इंदू सरकार, आरक्षण या सिनेमांनाही विरोध झाला होता. पण यावेळी कुणीही पुढे आलं नसल्याचे त्यांनी म्हंटले  आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)