‘पद्मावत’ च्या प्रदर्शनानंतर दीपिकाने घेतला ‘हा’ निर्णय

संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर अभिनेत्री दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.
‘पद्मावत’ सिनेमाला होत असलेल्या विरोधामुळे सिनमातील स्टार कास्टला खूपच त्रास झाला. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे अशा प्रकारच्या इतिहासावरील आधारित सिनेमात काम करणार नसल्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. एका कार्यक्रमात अभिनेत्री दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला होता की, या पुढे असा प्रकारच्या भूमिका करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने म्हटलं, “एवढे झाल्यानंतर आता अशा प्रकारच्या भूमिका मी करणार नाही”. दरम्यान, हा सिनेमा फेसबुकवर लीक झाला असून  जवळपास साडेतीन लाख यूझर्सनी हा ऑनलाईन लीक झालेला सिनेमा पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)