पद्मावती मंदिरास विद्युत मोटर भेट

चिंबळी- येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या पद्मावती माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी येथील उद्योजक तथा शिवसेना शाखाप्रमुख काळूराम बनकर पाटील व पद्मावती तरुण मंडळाचे अध्यक्ष समीर बनकर पाटील यांनी एक एचपी क्षमतेची विद्युत मोटर भेट दिली. मंदिर परिसरात सुशोभीकरण व सभागृहाचे काम सुरू असून विद्युत मोटार नादुरुस्त असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत होता. बनकर पाटील यांनी ही अडचण ओळखून स्वखर्चातून ही मोटर देऊ केली. त्यांच्या या दातृत्वाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)