पद्मावती मंदिराच्या विकासकामासाठी देणगी

चिंबळी- “जोडूनिया धन उत्तम व्यवाहारे’ या युक्तीप्रमाणे लग्न सोहळ्याचे औचित्य साधुन चिंबळी (ता. खेड) येथील उद्योजक तथा प्रगतिशील शेतकरी तसेच आदर्श माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे बाळासाहेब लोखंडे व वधूचे वडिल संभाजी लोखंडे यांनी एक सामाजिक कार्य म्हणून चिंबळीचे ग्रामदैवत पद्मावती देवीच्या मंदिर परिसराच्या विकासकामासाठी 51 हजार रूपयांची रोख देणगी दिली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पद्मामावती मंदिर
विकासकामाचे शिल्पकार काशिनाथ बटवाल यांच्याकडे सुपूर्त करण्यात केली. यावेळी खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, संचालक पांडूरंग बनकर, माजी अध्यक्ष अर्जुन जाधव, ज्ञानेश्‍वर कड, अध्यक्ष खंडू पाटारे, विश्‍वास बर्गे, अर्जुन अवघडे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, पवन पाटारे, शिवाजी कड, शंकर टल्लु जैद, लक्ष्मण सोनवणे, बाबासाहेब जाधव, श्रीरंग बनकर, शिवाजी लोखंडे, लक्ष्मण कातोरे, शंकर पाडूरंग जैद, अर्जुन लोखंडे आदि मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)