“पद्मावती’ पुढील वर्षी होणार प्रदर्शित 

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा महत्त्वकांक्षी “पद्मावती’ चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता. तसेच चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीमुळे बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट यंदा 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता.

“पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे स्पेशल इफेक्‍ट्‌स आणि कलाकारांच्या अनेक सीनचे चित्रीकरण झालेले नाही. भन्साली प्रॉडक्‍शन हाऊसने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण काही वृत्तानुसार चित्रपट यावर्षी प्रदर्शत होणार नाही. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात चित्रपट प्रदर्शन होईल. एप्रिलमध्ये शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी असल्याने चित्रपटाला फायदा होईल, असे म्हटले जात आहे.

चित्रपटाचे बजेट 150 कोटी रुपयांचे असल्याने निर्माते प्रत्येक बाजूने रिकव्हरीबाबत विचार करत आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्‍शनमध्येही जास्त वेळ लागणार आहे. युद्धाचे अनेक दृश्‍य आहेत, ज्यात व्हीएफएक्‍सचा वापर होणार आहे.
या चित्रपटाचे कथानक महाराणी पद्मावतीवर आधारित आहे. दीपिका पादूकोण पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी आणि शाहिद कपूर याने राजा रतन सिंहची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अदिती राव हैदरीही दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)