पद्मावती आणि सहिष्णुता

      पत्रसंवाद 

एखाद्या कलाकृतीच्या प्रदर्शनाविषयी देशांत पूर्वीही वादविवाद झाले आहेत. पण पद्मावतीबाबत जे वाद चालू आहेत त्यानी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राजस्थानातील किल्ले बंद करणे, दीपिकाला नाक कापण्याची धमकी देणे- हा सर्व अतिरेकच आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय जनमान अधिकाधिक असहिष्णू बनत गेले आहे. त्याचा हा दृश्‍य परिणाम आहे. सध्या सरकारचे इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत ते पाहता सरकारमध्येही सहिष्णुतेचा लवलेश नाही हे स्पष्ट आहे. साहजिकच सरकारचा आपल्याला पाठिंबा आहे असे आंदोलकांना वाटते. त्यामुळेच त्यांनी अतिरेक चालविला आहे. एकूणच भारतीय समाज अधोगतीकडे चालला आहे, हे दीपिकाचे म्हणणे पटावे अशीच आजची स्थिती आहे.

-Ads-

– घनश्‍याम पाठक, पुणे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)