पद्मश्री स्वीकारण्यास कर्नाटकातील स्वामीजींचा नकार

बेंगळूरू- प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शासनाने जाहीर केलेला पद्म पुरस्कार स्वीकारण्यास कर्नाटकातील एका स्वामीजींनी नकार दिला आहे. मी आयुष्यात कधीही मान-सन्मान स्वीकारला नसल्यामुळे हा पुरस्कार घेता येणार नाही, असे कारण त्यांनी दिले आहे.

विजयपुरा येथील ज्ञान योगाश्रम येथील सिद्धेश्वर स्वामीजी यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास अत्यंत विनयाने नकार दिला आहे. गेले 15 दिवस सिद्धेश्वर स्वामीजी हे कलबुर्गी येथे प्रवचन देत आहेत. याच दरम्यान माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.

मी आतापर्यंत कोणताही मान-सन्मान घेतलेला नाही. काही वर्षांपूर्वी कर्नाटक विद्यापीठाने दिलेली डॉक्‍टरेटही मी नाकारली होती. पद्म पुरस्काराला नकार देण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांना हा पुरस्कार मिळण्याची घोषणा होणे, ही त्यांच्या भक्तांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यांनी हा पुरस्कार जाहीर झाला असतानाही पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांचे मोठेपण सिद्ध होते, असे त्यांचे भक्त असलेले राज्यसभा खासदार बसवराज पाटील सेडाम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)