पदुच्चेरीतील राज्यपाल नियुक्ती आमदारांना विधानभवनात प्रवेश बंदी

पदुच्चेरी – पदुच्चेरी विधानसभेत राज्यपाल नियुक्ती सदस्य म्हणून भाजपच्या तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली होती पण या आमदारांना विधानभवनात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावेळी या आमदारांनी विधानभवनाच्या बाहेर समर्थकांसह धरणे धरले परंतु तरीही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या आमदारांना राज्यपालांनी सरकारशी सल्लामसलत न करता परस्पर नियुक्त केले आहे असा सरकारचा आरोप असून विधानसभेच्या सभापतींनी त्यांची ही नियुक्ती रद्दबातल ठरवली आहे.

सभापतींच्या निर्णयाला या आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे तेथे त्यांना न्याय मिळाला असून त्यांची नियुक्ती न्यायालयाने वैध ठरवली आहे. त्या आधारावर ते आज विधानसभेच्या अधिवेशनासाठी विधानभवनापाशी आले होते पण त्यांना तेथे प्रवेश नाकारण्यात आला. त्यांची निवड रास्त ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारली आहे. पदुच्चेरीत कॉंग्रेसचे सरकार आहे आणि तेथे राज्यपालांच्या अधिकाराचा वापर करून भाजपने आपल्या तीन जणांची तेथे आमदार म्हणून वर्णी लाऊन घेतली आहे असे हे प्रकरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)