पदासाठी पक्षश्रेष्ठींची कोंडी करण्याची गरज नाही

सौरभ शिंदे : सभापती बदलाच्या चर्चांना पूर्णविराम द्या

कुडाळ, दि. 28 (वार्ताहर) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आमची निष्ठा व बाबाराजेंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे बाबाराजेंना विधानसभेत पोचवण्याचं काम करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी आम्हा कोणत्याही पदाची आवश्‍यकता नाही. पदच पाहिजे, असे वागून पक्षश्रेष्ठींची कोंडी करण्याची काही गरज नाही. आम्ही एकदिलाने जावली पंचायत समितीचे काम करत आहोत. त्यामुळे सभापती बदलाच्या चर्चांना घेऊन कोणी पत्रकबाजी करत स्वतःची पोळी भाजून घेत असेल तर त्यास पूर्ण विराम मिळावा, आरक्षण वर घाला नको, असा इशारा सौरभ शिंदे दिला आहे.
गेले काही दिवस सभापती- उपसभापती बदलाची चर्चा जावली पंचायत समितीत सुरू सूरू आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना सौरभ शिंदे म्हणाले, आमच्या नावाचा इच्छुकांनी वापर करत हवा पसरवली आहे. स्वतः मी पदासाठी कधीच इच्छुक नव्हतो व मागणीही केली नाही. जावली पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आमची निष्ठा व बाबा राजेंवर पूर्ण विश्वास आहे. सभापती व उपसभापती बदल झाल्यावरच जोराचा फरक पडेल असे भासवणारे नेत्यांची दिशाभूल करत स्वतःचे महत्व वाढवत आहेत. बाबाराजेंना विक्रमी मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार असून त्यासाठी पदाची गरज नाही. बाबाराजे जी जबाबदारी देतील ती पार पाडून जावळीत पक्ष मजबूत करू.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)