पदार्पणात दमदार अर्थशतकी खेळी करणारा मयंक आगरवाल दुसरा भारतीय

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. लोकेश राहूल आणि मुरली विजय या दोन्हीही सलामीवीरांना या कसोटीत डच्चू मिळाल्याने डावाची सुरुवात हनुमा विहारी आणि मयंक आगरवाल यांना करण्याची संधी मिळाली.

हनुमा विहारी स्वस्तात बाद झाल्यानंतर आगरवाल आणि पुजारा यांनी डावाला आकार देत दुसऱ्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदार्पणात ऑस्ट्रेलियामध्ये अर्धशतकी खेळी करणारा आगरवाल दुसराच भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सिडनी मैदानावर डिसेंबर १९४७ साली झालेल्या कसोटी सामन्यात अमीर इलाही यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. तब्बल ७१ वर्षांनी मयंक आगरवालने हा रेकॉर्ड मोडत अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय म्हणून मान मिळवला.

आगरवालने पदार्पणात दमदार ७६ धावांची खेळी करत येणाऱ्या २,३ मालिकांमध्ये खेळण्याची दावेदारी भक्कम केली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढण्याचा फायदा त्याला झाल्याचे दिसून आहे. भारताने चहापाण्यापर्यंत २ बाद १२३ दावा केल्या आहेत. पुजारा ३३ धावांवर खेळत आहे.बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत निर्णायक आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)