पदार्पणातच शॉचा ‘शो’ ; दिवसअखेर भारत 4 बाद 364

पृथ्वी शॉचे स्वप्नवत कसोटी पदार्पण ; पहिल्या दिवसअखेर भारताचे वेस्ट इंडीजवर वर्चस्व

कसोटी क्रिकेट सामना : पुजारा-पृथ्वी शॉ यांची द्विशतकी भागीदारी

राजकोट: पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉचे स्वप्नवत कसोटी पदार्पण आणि चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत त्याने केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे आज सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाला वेस्ट इंडीजवर वर्चस्व गाजविता आले.

विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या योगदानामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावांत 4 बाद 364 धावांची मजल मारली. आजचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद 72 धावांवर खेळत असून ऋषभ पंत नाबाद 17 धावांवर त्याला साथ देत आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली, तेव्हाच पृथ्वीच्या कसोटी पदार्पणाची सर्वजण प्रतीक्षा करीत होते. शेनॉन गॅब्रिएलने अनुभवी सलामीवीर लोकेश राहुलला पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर पायचित करून भारताला जबरदस्त हादरा दिला. परंतु पृथ्वी शॉने सावध खेळी करताना चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत भारताचा डाव सावरला आणि वेस्ट इंडीजला दुसऱ्या बळीसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावली.

संक्षिप्त धावफलक-
भारत- पहिला डाव- 89 षटकांत 4 बाद 364 (पृथ्वी शॉ 134, चेतेश्‍वर पुजारा 86, विराट कोहली नाबाद 72, अजिंक्‍य रहाणे 41, ऋषभ पंत नाबाद 17 शर्मन लुईस 56-1, शेनॉन गॅब्रिएल 66-1, देवेन्द्र बिशू 113-1).

———————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)