पदाधिकारी दौऱ्यावर, पाणी पुरवठा वठणीवर!

पिंपरी – दोन महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रारी, आंदोलने केली. मात्र, पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असताना पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. या मागचे गौडबंगाल काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, शहराचा गेल्या काही दिवसांपासून विविध भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. पाणी प्रश्नासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यानंतरही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. मात्र, महापौर, सभागृह नेता, विविध पक्षाचे गटनेते, आयुक्त, महापालिकेचे महत्त्वाचे अधिकारी स्मार्ट सिटी अंतर्गंत स्पेन येथील बर्सिलोना या शहराचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर गेले. तर, अधिकारी दिवाळीची सुट्टी साजरी करीत आहेत. यापूर्वी दिवाळीची सुट्टी व शनिवार, रविवार असे 8 दिवस म्हणजे एकूण 15 दिवस आपल्या व पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शहराचा कारभार रामभरोसे चालू आहे. असे असतानाही मागच्या 20 दिवसामपासून सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने होत आहे.

-Ads-

नागरिकांची पाण्याविषयी तक्रार नाही. महत्त्वाचे पदाधिकारी व अधिकारी नसतानाही पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. यामागचे गौडबंगाल नागरीकांच्या लक्षात येत नाही. हे सर्व संगनमताने नागरिकांना वेठीस धरुन कोणाला तरी आपले इप्सित साध्य करण्याकरिता जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली की काय? अशी शंका भापकर यांनी उपस्थित केली आहे. याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)