पदवी विषयानुसार होणार शिक्षक नियुक्‍ती

राज्य शासनाचा निर्णय : अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारेच भरती

पुणे – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गावर पदवीच्या विषयानुसार शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टलवर कार्यान्वित केले आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारेच ही भरती करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शासन निर्णयाद्वारे पूर्वीच निश्‍चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असले तरी इयत्ता सहावी ते आठवीसाठी नियुक्‍त करावयाच्या शिक्षकांनी पेपर – 2 या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्‍यक असले तरी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता कोणतीही अट निर्धारित केली नसल्यामुळे उमेदवार त्यांच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखेचे विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

आता इयत्ता सहावी ते आठवीच्या गटासाठी उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा गणित, विज्ञान किंवा समाजशास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असला तरी पात्र उमेदवारांची नियुक्‍ती सद्यस्थितीत फक्‍त आगामी शिक्षक भरतीकरिता त्यांच्या पदवीच्या विषयानुसार राहील, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव चारुशीला चौधरी यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)