पदवी विद्यार्थ्यांना “स्वच्छ भारत’ स्वतंत्र विषय

पदवीसाठी दोन श्रेयांक मिळवता येणार
पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेचा आता विद्यार्थ्यांना पदवीतही स्वतंत्र विषय घेता येणार आहे. शिक्षणसंस्थांनी हा विषय उपलब्ध करून दिल्यास या योजनेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना पदवीसाठी दोन श्रेयांक मिळवता येणार आहेत. इतकेच नाही तर या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार आहे.
स्वच्छ भारत अभियान हे पदवी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र विषय म्हणून उपलब्ध करून द्यावे अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिल्या आहेत. आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वच्छ भारत अभियान या विषयासाठी दोन श्रेयांक असणार आहे. पदवी स्तरावर असलेल्या वैकल्पिक विषयांमध्ये त्याचा समावेश होईल. त्यामुळे महाविद्यालयांनी हा विषय उपलब्ध करून दिल्यास परिसराची स्वच्छता करून आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक पदरी पाडून घेता येतील. यासाठी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत पंधरा दिवसांची किंवा शंभर तासांची इंटर्नशिपही करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परिसराची किंवा गावाची स्वच्छता राखण्याच्या कामात सहभागी होण्याबरोबर कायम स्वच्छता राहण्यासाठी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योजनांची आखणी करणे अपेक्षित आहे. या विषयामुळे विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक अनुभव मिळून शैक्षणिक गुणवत्ता वाढेल असे आयोगाने विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)