पदवी प्रमाणपत्र जाळत नोंदवला निषेध

पुणे – राज्य शासनाच्या मेगाभरतीत केवळ पदविका अभियांत्रिकी उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले असून, पदवी अभियांत्रिकी उमेदवारांना वगळण्यात आले आहे. त्या विरोधात अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, सोमवारी उपोषणाचा सातवा दिवस होता. उपोषणाची कोणतीच दखल न घेतल्याने 15 उमेदवारांनी चक्‍क आपले पदवी प्रमाणपत्र जाळत निषेध नोंदविला.

राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी केवळ पदविका अभियांत्रिकीना पात्र ठरविले, तर पदवी अभियांत्रिकींना अर्ज करण्यास अपात्र ठरविले आहे. जुन्याच नियमानुसार ही भरती प्रक्रिया होत असून, यात पदवी अभियांत्रिकी उमेदवारांचा समावेश करावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. सोमवारी उमेदवारांनी पदवी प्रमाणपत्र जाळत आपल्या संतप्त भावना व्यक्‍त केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पदवी अभियांत्रिकी उमेदवारांनी केलेल्या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि.29) रोजी मुख्य सचिवांबरोबर बैठक होणार आहे. त्यात उपोषणकर्ते आपले म्हणणे मांडणार आहेत. त्यामुळे उमेदवारांची मागणी मान्य होणार का, हेच आता पाहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)