पदवीप्रदानच्या नव्या पोशाखावरील वादावर पडदा

संग्रहित छायाचित्र

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 114 वा पदवीप्रदान सोहळा येत्या शुक्रवारी (दि. 11) होत आहे. या समारंभासाठी यंदापासून व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे, फक्‍त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणेच पगडी असा पोशाख आहे. पगडीत कोणताही बदल नसून, विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पगडी अथवा टोपी राहणार असल्याचे स्पष्ट करीत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नव्या पोशाखावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला.

सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांची पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठाच्या नव्या पोशाखाच्या पगडीवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कुलगुरूंनी पूर्वीचा गाऊन बदलला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदव्युत्तर स्तरावरील पदवी प्रमाणपत्रांचे वितरण विद्यापीठ परिसरात प्रशासन भवनाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या परीक्षा भवनामध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत वितरित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर उर्वरित प्रमाणपत्रे व बहि:स्थ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठाकडून पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.

महाविद्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांना दि. 14 फेब्रुवारीपर्यंत पदवी प्रमाणपत्रे वितरण सोहळ्यात वाटली जाणार आहेत. तसेच महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यानंतर उर्वरित पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयाकडूच विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहे.

यंदा 1 लाखांहून अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान
पदवीप्रदान समारंभात सन 2017-18 मध्ये व त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर स्तरावरील एकूण 21 हजार, 366 आणि 441 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 70 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर पदवी स्तरावरील 80 हजार, 613 विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयांकउे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)