पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी कामाला लागा

मेढा : पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमात बोलताना सारंग पाटील समवेत वसंतराव मानकुमरे, पांडुरंग जवळ, अर्चना रांजणे, अरुणा शिर्के, चंद्रकांत देशमुख व इतर. (छाया : शशिकांत गुरव)

राष्ट्रवादीला यश मिळत नसल्याची सारंग पाटील यांची खंत
मेढा, दि. 12 (प्रतिनिधी) – पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतानाही आजअखेर पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला नाही ही खंत मनाला बोचत असून आपण कधी गामभीर्याने या मतदार संघाकडे बघितलेच नाही आणि भाजपाला या निवडणुकीचे तंत्र अवगत आहे. मात्र 2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा निर्मला दुधाने, जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, कविता धनावडे, उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, चंद्रकांत देशमुख, ज्ञानदेव रांजणे, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सारंग पाटील पुढे म्हणाले, 11 लोकसभा व 58 तालुके, अंदाजे 5 लाख मतदार असा प्रचंड विस्तार असलेला हा पुणे पदवीधर मतदार संघ आहे म्हणून उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी आहे. दरवेळी आपण या निवडणुकीकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला कंबर कसून काम करावे लागणार असून मागच्या वेळी संधी थोडक्‍यात हुकली आहे.
ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे, अरुणा शिर्के, पांडुरंग जवळ, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, प्रा. प्रमोद घाडगे यांची भाषणे झाली. आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष सागर धनावडे यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष नितीन गावडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)