पदवीधर संघटना शिक्षकांचे हित जपणारी

अण्णापूर- अलिकडच्या काळात केवळ पदासांठी संघटना स्थापन होत असताना संघटना प्रमुखाच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याच्या स्मृती पुरस्कार रुपाने जतन करणारी शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना निश्‍चितच कौतुकास पात्र असून शिक्षकांचे हित जपणारी असल्याचे गौरवोद्‌गार शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी काढले.
शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय धर्मराज कर्पे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंताना स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्कारांचे वितरण शिक्षक भवनमध्ये माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पदवीधर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दत्तात्रय सावंत, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी मनोगते व्यक्‍त केले. याप्रसंगी शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोपान धुमाळ, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत संकपाळ, शिरुर तालुका शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सतीश नागवडे, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष संजय, तर्डोबावाडीच्या सरपंच धनश्नी मोरे, दरेकरवाडीच्या सरपंच दरेकर, गुनाटच्या सरपंच दिप्ती करपे, माजी सरपंच, गहिनीनाथ डोंगरे, कोंढापुरी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस. एस. गायकवाड, खुशालराव मोरे, गंगाराम साकोरे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सतीश पाचर्णे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आसवले, शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संध्या धुमाळ, निलेश गायकवाड, पत्रकार रवी पाटील, नागनाथ शिंगाडे, पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान पदवीधर संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी नव्याने निवड झालेले नरहरी नरवडे व संघटनेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शन करणारे अविनाश कुंभार व पांडुरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक तालुकाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरचिटणीस ज्ञानेश पवार यांनी केले. जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे यांनी आभार मानले. सोहळ्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सुरेश खैरे, कार्याध्यक्ष प्रदीप थोरात, नरहरी नरवडे, प्रदीप गव्हाणे, निलेश गायकवाड, उमेश धुमाळ, अशोक कर्डिले, कल्याण कोकाटे, रामदास कौठाळे, सूर्यकांत टाकळकर, दत्तात्रय गडदरे, राजेंद्र चोरे, शांताराम पोकळे, संजय तळोले यांनी परिश्रम घेतले.

  • तिळ्यांचा शिष्यवृत्तीत पराक्रम
    पदवीधर शिक्षक संघटनेच्या स्व. धर्मराज कर्पे स्मृती पुरस्कारांच्या मानकऱ्यात शिक्रापूर येथील रेणुका, वैष्णवी व सार्थक या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. मूळचे शिक्रापूर (ता.शिरुर) येथील रहिवाशी व सध्या कुडे (ता. खेड) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणारे धनाजी धुमाळ व कडुस (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका संगीता धुमाळ यांची ही तिन्ही मुले आहेत. गेल्यावर्षीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रेणुका हिने 270 गुण, वैष्णवी हिने 264 गुण मिळवित राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. सार्थक 236 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला आहे. या तिघांनी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. एमटीएस परीक्षेतही ते गुणवत्ता यादीत चमकले आहेत. माजी आमदार व उपस्थित मान्यवरांनी या तिळ्यांचे विशेष कौतुक केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)