– “बीआरटी’चे प्रवक्‍ते विजय भोजने यांची माहिती

पिंपरी- शहरातील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील पदपथ विकसित करणार आहे. “अर्बन स्ट्रीट डिझाईन’ अंतर्गत उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी आकुर्डी परिसराची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उपअभियंता तथा “बीआरटी’चे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील आठवड्यात 52 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हा 18 मीटर रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते रावेत बास्केट ब्रीज हा 24/ 30 मीटर रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वारा चौक 18 मीटर रस्ता आणि जगताप डेअरी ते मुठा नदीपर्यंतचा 24 मीटर रत्यावरील पदपथ विकसित करण्यात येणार आहेत. त्यानंतर भविष्यात पिंपरी, दापोडी, कासारवाडी या गर्दीच्या ठिकाणचे पदपथ विकसित करण्याचे नियोजित आहे. पादचारी नागरिकांना रस्ता उपब्ध होत नाही. अशा ठिकाणी पादचारी नागरिकांना सुरक्षा देण्याचे नियोजन आहे.
आकुर्डी परिसरात शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. त्यासोबतच नव्याने विकसित झालेल्या रहिवासी परिसर व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या परिसरात आहे. हा परिसर वर्दळीचा असून या भागात दिवसाला 60 ते 70 हजार विद्यार्थी, 20 ते 25 हजार कामगार, कर्मचारी अशी सुमारे सव्वा लाख नागरिकांची ये-जा असते. त्यात पादचा-यांची संख्या अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)