“पदनाम’ची चौकशी राज्यपालांमार्फत : तावडे

file photo ...

पुणे – राज्यातील पाच विद्यापीठांत शिक्षकेतर सेवकांनी पदनामात बदल करून वेतनश्रेणी वाढवून घेतली. या प्रकरणात काही विद्यापीठांच्या कुलगुरूंचा प्रत्यक्षदर्शी सहभाग आहे. त्यामुळे या पदनामाची चौकशी राज्यपाल यांच्यामार्फत होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

सध्या पदनामावरून पाच विद्यापीठांत मोठी खळबळ उडाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाचा यात समावेश आहे. सुमारे 1 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पदनाम बदलून वेतनश्रेणीत बदल करून घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बरीच वाढ झाली आहे. दरम्यान, या सर्व कर्मचाऱ्यांनी वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य शासनाने दि. 17 डिसेंबर रोजी घेतला. त्यामुळे पदनाम बदललेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीच्या पदावरून होणार आहे. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत घेतलेले वाढीव वेतनही वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात तावडे म्हणाले, पदनाम प्रकरणात काही कुलगुरूंचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांची चौकशी राज्य शासनाकडून करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही सर्व बाब राज्यपालांपुढे मांडणार आहे. त्यानंतर या सर्व प्रकाराचा त्यांच्यामार्फत चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदनामात बदल करून वेतनश्रेणीत बदल केलेल्या शिक्षकेतर सेवकांकडून अतिरिक्‍त रक्‍कम वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे विद्यापीठास कार्यवाही करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पदनाम केलेले सेवकांचे वेतन पूर्ववत म्हणजेच पदनामाच्या पूर्वी असलेली वेतनश्रेणी पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनने आज प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पदनामात बदल केलेले कर्मचारी आता आर्थिक कचाट्यात सापडणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)