पथारी व्यावसायिकांचा गुरूवारी मोर्चा

 भाडेवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप

पुणे – पथारी व्यावसायिकांचा गुरूवारी (दि. 5 एप्रिल) महापालिका भवनावर मोर्चा आयोजित केला आहे. पथारी व्यावसायिकांना लावण्यात आलेल्या कर हा जिझीया कर असून, तो हटवा अशी आंदोलकांची मागणी आहे.

‘पथारी व्यावसायिक संघर्ष कृती समिती’तर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पथारी व्यावसायिक संघर्ष कृती समिती, पुणे शहरचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पुणे शहरातील विविध पथारी व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता दगडूशेठ गणपती मंदिराजवळील मजूर अड्डा येथील हुतात्मा कर्णिक स्मारका जवळून हा मोर्चा सुरू होणार आहे. मोर्चा शनिपार, बाजीरावरोड मार्गे शनिवारवाडा आणि तिथून हा मोर्चा पुणे महापालिका भवनात जाणार आहे. ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत महापौर मुक्ता टिळक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

पथारी व्यावसायिकांवर लादलेला जिझीया कर हटवावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच भाजप आमदाराला 14 पैसे चौरस फूट दर आणि गरिब पथारी व्यावसायिकाला 12 रुपये चौरस फूट दर लावणे अन्यायकारक आहे., याद्वारे गरिबाचा जगण्याचा हक्क हिरावून घेऊ नये, पथारी व्यावसायिकांसाठी केलेली 703 पट भाडेवाढ अन्यायकारक असून, ती रद्द करावी, पथारी व्यावसायिकांकडून दर दिवसाऐवजी दरमहिना भाडे घ्यावे, दिव्यांग आणि विधवा पथारी व्यावसायिकांकडून अत्यल्प भाडे घ्यावे या मागण्या असल्याचे माळवदकर म्हणाले. पथारी व्यावसायिकांवर कारवाई करताना महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप माळवदकर यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)