पथारीधारकांनो बकेट ठेवा अन्यथा दंडात्मक कारवाई

पालिका प्रशासनाचा इशारा

पुणे – महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरातील स्टॉल, हातगाडी, पथारी या फेरीवाला व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कचरा संकलनासाठी प्लॅस्टिकच्या बकेट ठेवाव्यात, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

-Ads-

शहरात सार्वजनिक आणि व्यक्तीगत स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घाण करणे, थुंकणे, लघुशंका करणे आणि शौच करणे या कारणासाठी संबंधीत व्यक्ती आणि संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाई मोहीमेचा मोर्चा आता शहरातील स्टॉल, हातगाडी, पथारी या फेरीवाला व्यावसायिकांकडे वळवला आहे.

या व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवसाय करताना कोणताही प्रकारचा केर कचरा व्यवसायाच्या सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. ज्या फेरीवाला व्यवसायिकांचा व्यवसायानिमित ओला अथवा सुका कचरा निर्माण होणार असेल, अशांनी त्या ठिकाणी स्वतंत्र लहान आकारातील प्लॅस्टिकच्या बकेट ठेऊन कचरा गोळा करावा. तसेच तो महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या सेवकांना विलगीकरण करून द्यावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांचे व्यवसाय परवाने निलंबीत करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)