पथदिवे बंद असल्यामुळे चालकांचा अंधारात प्रवास

नॅशनल हायवे ऍथरिटीने उभारले पथदिवे

पेठ- पेठ गावातून गेलेल्या हायवेवर अनेक महिन्यांपासून नॅशनल हायवे ऍथरिटीने उभारलेल्या पथदिव्यांना लाईट नसल्यामुळे नागरिक व ग्रामस्थांना अंधारात प्रवास करावा लागत आहे. गेले कित्येक महिने हे पथदिवे बंद असल्यामुळे रस्त्यावरचा अंधार काही संपताना दिसत नाही. पावसाळ्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एक खांब पडला असून त्यामुळे उभारलेल्या खांबांच्या कामाबाबत नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सुमारे दोन किमीच्या पट्टयामध्ये अंधार असल्यामुळे महिला, नागरिक, विद्यार्थी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी हे पथदिवे लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जवळपास दोन किमीच्या पट्ट्यात पथदिवे बंद असल्याने विशेष करून रात्रीच्या वेळी महिला, तरुण मुली यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तरी लवकरात लवकर हायवे वरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पथदिव्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आर्माड केबलमध्ये समस्या आहे. त्यामुळे पथदिवे बंद असून सदर केबलची लवकरात लवकर उपलब्धता करून पथदिवे सुरू करण्यात येतील.
राहुल टिकेकर, मेंटेनन्स अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)