राजेगाव- सध्या लग्नसराईची धूम असून ग्रामीण भागात अनेक सोहळे पार पडत असताना निमंत्रण पत्रिका देऊन उपस्थितांकडून सोहळ्याची शोभा वाढवण्यात येते. मात्र, पत्रिका वाटपाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, मॅसेंजर आणि मोबाईल कॉलिंग करून थेट आमंत्रण दिले जात आहे. लग्न सोहळे म्हटलं की, पै-पाहुणे,मित्रमंडळी, आप्तेष्ट आदींना घरपोच निमंत्रण आलेच. मात्र, यातूनही अनावधनाने चुकून एखादे निमंत्रण राहिले तर, रूसवे फुगवे आलेच. मात्र, सोशल मीडियाचा चांगलाच उपयोग होत आहे. निमंत्रण पत्रिका वाटपाचे पध्दत (फॅड) आता काहींना नकोसे वाटत आहे. सोशल मीडियाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने त्यावरच लग्नसमारंभ आणि इतर कार्याच्या पत्रिका बनवल्या जात आहेत. काहींनी सोशलचा चांगला उपयोग करून पत्रिकांसोबत सामाजिक संदेश पोहोचवत आहेत. “पाणी वाचवा’, “झाडे लावा, झाडे जगवा’, “सारे शिकुया, पुढे जावूया’, “लेक वाचवा, लेक शिकवा’, “शौचालय जेथे, आरोग्य तेथे’ असे सामाजिक संदेश या पत्रिकांमध्ये दिसत आहेत. काही पत्रिकामध्ये लग्न कार्यामध्ये आहेर आणि भेट वस्तू ऐवजी पुस्तके, झाडांची रोपे स्विकारली जातील, अशा सामाजिक टीपही पहायला मिळत आहेत. निसर्गाच्या असमतोलामुळे सूर्य आग ओकत आहे. आणि याला मानवीय प्रवूत्ती कारणीभूत आहे. एकंदरीत मोबाईल दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांची प्रगती यामुळे समारंभासाठी होणाऱ्या गाठी-भेटी कमी होऊन कमी खर्चात मॅसेज (संदेश), फोन कॉल आदी पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण, लग्नाला यायचच हं! सध्या जीओ सीमने बाजारात आपली क्रेझ वाढवल्याने वधू-वरांच्या मंडळीकडून नातेवाईक, आप्तेष्टांना प्रत्यक्ष फोनकॉल करून लग्नाला यावचं लागेल! असे आग्रहाने सांगण्यात येते. कमी दरात नेटपॅक आणि फ्री फोन कॉलिंग सुविधेमुळे अधिक वेळ आणि बळजबरीने निमंत्रण देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)