#पत्रसंवाद: योग आणि समाज 

निरनिराळे दिन साजरे केले जातात. तसाच “योग-दिन’ निरनिराळ्या सोसायट्यांमधून, बागांमधून, मैदानांवर योग-दिन साजरा केला जातो. योग-गुरू लोकांना अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना योग कसे करावेत ते शिकवतात. काही योग-गुरू सूर्यनमस्कारही शिकवतात. सूर्यनमस्कारात निरनिराळे दहा योग येतात आणि या सूर्यनमस्काराचे महत्त्व शरीर प्रकृती तंदुरूस्त ठेवण्याकडेच असते. या सगळ्या गोष्टी, निरनिराळे दिन बहुतकरून उच्च-मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय लोकांत फार प्रचलित आहेत. यात अगदी पंतप्रधानसुद्धा भाग घेतात. फार चांगली गोष्ट आहे, तरी पण हे योग-वर्ग बारमाही चालावेत त्यासाठी एकच “योग-दिन’ असू नये कारण “सर्व दिन-योग-दिन’ अशी परंपरा असावी. तरच राष्ट्र सुदृढ राहील. तसेच हे योग-दिन, योग-वर्ग निरनिराळ्या वस्त्यांमधून, झोपडपट्ट्यांमधून प्रचलित झाले पाहिजेत, जसे स्वरूप वर्धिनी संस्थेत असे कार्यक्रम गरीब वर्गातील मुलांसाठी, लोकांसाठी राबवले जातात.
– गोपाळ द. संत, पुणे 
नीट, सेट सक्ती नको 
गेल्या 25 वर्षांत भारतात अनेक नवी विद्यापीठे व महाविद्यालये उघडण्यात आली आहेत. प्राध्यापकांचा मोठ्याप्रमाणात तुटाव आहे. केंद्र शासनाने “नीट” बंद न करता त्यातील नियमात फेरबदल करावेत. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थिती इतर सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे भारताने त्यांचे शैक्षणिक किंवा व्यावसायिक धोरणात नक्कल करू नये. नीट, सेटची सक्ती नसावी.
– सुनिल पेडगावकर, अक्कलकोट 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)