#पत्रसंवाद: मदतकार्यास एनडीआरएफचे कायमस्वरूपी पथक हवे 

सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी (तसेच रायगड जिल्ह्याचा काही भाग) या शेजारी शेजारी असलेल्या जिल्ह्यांमधील दुर्गम भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीमुळे महापूर येणे, दरडी, नद्यांवरील पूल कोसळणे अशा आपत्तींबरोबरच पुलांवरून, घाटांतून वाहने खाली पडणे असे भीषण अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले आहेत. या भागात अशा दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन, मुंबई येथे असलेल्या “एनडीआरएफ’च्या पथकास मदतीसाठी पाचारण करते.
परंतु दूरचे अंतर व ठिकठिकाणी होत असलेला वाहतुकीचा खोळंबा (ट्रॅफिक जॅम) यामुळे या पथकास मुंबई-पुण्याहून दुर्घटनास्थळी पोहोचण्यास 8-10 तास लागतात. तोपर्यंत स्थानिक जिगरबाज तरुण, गिर्यारोहक, मच्छीमार हे अपुऱ्या साधनांनिशी व कसलेही प्रशिक्षण घेतलेले नसताना जीव धोक्‍यात घालून धाडसाने मदतकार्य सुरू करतात, हे प्रशंसनीय! यासाठी सरकारने या तीन-चार जिल्ह्यांच्या मध्यावर “एनडीआरएफ’चे एक सुसज्जन पथक कायमस्वरूपी तैनात ठेवायला हवे आहे. जेणेकरून हे पथक अल्पावधीत दुर्घटनास्थळी पोहोचून अधिकाधिक निष्पापांचे प्राण वाचवेल. सरकारने या सूचनेचा प्राधान्याने विचार करावा. आपत्ती व्यवस्थापन हा आपल्याकडे तसा दुर्लक्षित प्रकार असला, तरी आता त्याकडे पूर्वीसारखे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे विविध घटनांतून अनेकदा अनुभवण्यास आले आहे, हे नक्‍की.
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)