#पत्रसंवाद:  भारतात “टॅलेंटची’ कमी नाही! 

यवतमाळच्या दर्डा अभियांत्रिकीतील एका 27 वर्षाच्या अजिंक्‍य कोत्तावार या युवकाने स्वत:च्या नावावर 18 पेटंटची नोंदणी केली आहे. एकाच दिवशी त्याने चार पेटंटची नोंद करून शास्त्रज्ञ सर आयझेक न्यूटन व अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वाहनांची कार्यक्षमता वाढविणारे इंजिन, चहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेले बायोडिझेल, बायोमेट्रिक व्होटिंग मशीन, मल्टीफ्युएल इंजिन, वॉटर प्युरिफायर बॉटल अशी अनेकाविध संशोधने या तरूण युवकाने करून दाखविली आहेत. याशिवाय त्याने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कृषी, या क्षेत्रांचे संशोधन चालूच ठेवले आहे. जागतिक कीर्तीच्या न्यूटनच्या नावावर वयाच्या केवळ 25 व्या वर्षी 15 पेटंटची नोंद होती, या अजिंक्‍यच्या नांवावर 12 पेटंटची नोंद आहे, यातच त्याचे वेगळेपण दिसून येते. अलीकडेच ऑस्ट्रेलियांत स्थायिक झालेल्या अक्षय वेंकटेश या युवकांनेही गणितात फिल्डस मेडल मिळवून भारताला गौरव प्राप्त करून दिला होता.
आजही त्याच्या डायनॉमिक्‍स थेअरीच्या संशोधनाची साऱ्या जगाने दखल घेतली आहे. भारतात आज असे अजिंक्‍य किंवा अक्षयसारखे हुशार युवक आहेत. आज असे युवक शोधून त्यांना गरज आहे प्रोत्साहन देण्याची! महाविद्यालये, विद्यापीठे यांनी असे युवक शोधून त्यांना योग्य त्या सुविधा पुरविल्या तर असे अनेक युवक आपले बुद्धिमत्तेचे कसब व कौशल्य खात्रीने दाखवतील!
– शांताराम वाघ, पुणे 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)