पत्रसंवाद : बहिष्कार टाकायला बळ हवे !

प्रमोद बापट, पुणे

पुलवामा घटनेतून होत असलेला जनक्षोभ आता विविध क्षेत्रात उमटू लागला आहे. क्रीडाक्षेत्रही आता पुढे आले आहे; विशेषतः क्रिकेट. आजी-माजी खेळाडू, क्रीडा विभाग, नागरिक, संघटना हे सर्व मते मांडीत आहेत व प्रतिक्रिया देत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अर्थात आयसीसी ही संस्था मात्र गल्ल्यावर डोळा ठेवून भूमिका मांडते की काय असे वाटू लागते. हजारो कोटींची कमाई आणि वर करातून सूट, अशीच रचना असलेल्या या संघटनेत राजकीय वर्चस्वासाठी रस्सीखेच चालूच असते. आणि म्हणून इप्सित गोल साध्य होण्यासाठी काही तारांकित माजी खेळाडूंना हाताशी धरून आपलाच मुद्दा रेटायचा प्रयत्न होत असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकेकाळी कृषी आणि क्रिकेट एकाच व्यक्तीच्या हातात असताना सुद्धा, कृषी व कृषिवल विषय मागे पडून क्रिकेटला झुकते माप मिळाल्याचे आठवत असेलच आपल्याला !

आता जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे की नाही हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. संयुक्‍त राष्ट्रांमध्ये (यूएन) मध्ये उच्च पदावर काम केलेले कॉंग्रेस खासदार शशी थरूर तर सामना न खेळल्यास तो पराभवच किंवा शरणागती ठरेल असे दणकून सांगत आहेत. कदाचित त्यांचा बोलविता धनी वेगळाच असावा. हा प्रश्‍न फार गहन नाही, हे जरा इतिहासात डोकावले तर कळेल.

डेव्हिस कप या टेनिसच्या जागतिक स्पर्धेत सुमारे 20-25 वर्षांपूर्वी (नक्की साल शोधून काढावे लागेल) आपण अंतिम
स्पर्धेत पोहोचलो होतो. समोर प्रतिस्पर्धी होता दक्षिण आफ्रिका ! पण वर्णद्वेषाच्या अधीन गेलेल्या या देशाविरुद्ध अंतिम सामना असूनही खेळण्याचे नाकारून आपला संघ परत फिरला होता.

इतकेच नव्हे तर ऐशीच्या दशकात रशियातील मॉस्को येथे झालेल्या संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धेवरच अमेरिकेने बहिष्कार टाकला होता. अमेरिका-रशियामधील छुपे युद्ध अर्थात “कोल्ड वॉर’चा तो परिणाम होता. जर किमान 70 क्रीडा प्रकार, 125 हून अधिक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेवर एखादा देश बहिष्कार टाकू शकतो, तर मग भारताने क्रिकेट वर्ल्डकपवरच बहिष्कार का टाकू नये? शशी थरूर आणि त्यांचा बोलविता धनी या घटनेला काय म्हणणार? पराभव, शरणागती, की जागतिक भावनेचा आदर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)