#पत्रसंवाद: इंधन दरवाढ किती? 

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे पेट्रोल 86 रुपयांच्या पुढे तर डिझेल 75 रुपयांच्या पुढे गेले आहे महाराष्ट्रातील काही शहरात तर पेट्रोलचा दर 90 रुपयांच्या घरात गेला आहे. दररोज पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात आहे लवकरच हा आकडा शंभरी पार करेल. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने ग्रामीण भागासह मेट्रो शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर आटोक्‍यात ठेवण्यात सरकारला अपयश येत आहे म्हणून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पेट्रोल डिझेलचे दर वाढले की मालवाहतूकदार खाजगी बस, स्कूल बस, रिक्षा, टॅक्‍सी चालक तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तिकीट दर वाढतात मालवाहतूकदारांनी दर वाढवले की जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढतात एकूणच पेट्रोल डिझेलचे दर वाढले की महागाई वाढते हे आजवरचे सूत्र आहे आधीच महागाईने कळस गाठला आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने महागाई आणखी भडकण्याची शक्‍यता आहे या महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघणार आहे इतके सारे घडत असताना केंद्र सरकार मात्र हातावर हात ठेवून बसले आहे पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही यु पी ए सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलचे दर वाढले की नरेंद्र मोदींसह भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तेव्हा यूपीए सरकारवर कडाडून टीका केली होती आता ते सत्तेवर असताना ही दरवाढ रोखण्यासाठी त्यांनी तत्परतेने निर्णय घेणे आवश्‍यक आहे पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील अबकारी कर तातडीने रद्द करायला हवा तसेच पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणायला हवे
– श्‍याम ठाणेदार, दौंड 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)