#पत्रसंवाद: …असे आंदोलन करणे  कितपत योग्य? 

राखीव जागांच्या मागणीसाठी समाजातील वेगवेगळे घटक सध्या राज्यभर आंदोलने, निदर्शने करत आहेत. या आंदोलनात बॉनेटवर आपापल्या समाजाची ओळख सांगणारे झेंडे लावलेली तवेरा, डिझायर, स्कॉर्पिओ, इनोव्हा, फोर्ड इको स्पोर्ट, एक्‍सयूव्ही, सफारी, फॉर्च्युनर ऑडी अशी वाहने घेऊन आंदोलक सहभागी झाल्याचे बऱ्याचदा दिसून येते. या गाड्यांमधून आंदोलनस्थळी येणाऱ्या अनेक आंदोलकांच्या अंगावर उंची अत्तर शिंपडलेले भारी कपडे, गळ्यात सोन्याचे जाडजूड गोफ व मनगटात सोन्याची कडी असतात.
डोळ्यांवर दहा दहा हजारांचे “पोलीस गॉगल्स’ लावून इंदोरी फटाक्‍यांचा फाडदिशी आवाज काढणाऱ्या टॉप मॉडेलच्या बुलेट गाड्यांना झेंडे लावून त्या उडविणारे आंदोलकही राखीव जागा मागणीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने दिसतात. या सर्वांना राखीव जागा सोडण्याबद्दल दुमत नाही. त्यांना राखवण (आरक्षण) मिळायलाच हवे. परंतु उंची राहणीमान असणाऱ्यांनी स्वतःच्या चाळीस चाळीस लाख रुपये किमतीच्या वाहनात बसून राखीव जागांची मागणी करणे, हे अनाकलनीय आहे. मध्यंतरी घरून चटणी भाकरी बांधून घेऊन हुल्लडबाजी न करता, उन्मादाचे, ऐश्‍वर्याचे ओंगळवाणे प्रदर्शन न करता अनवाणी पाय रक्ताळेपर्यंत नाशिक ते मंत्रालय अशी शिस्तबद्ध पदयात्रा काढून बळीराजाने जे आंदोलन केले होते, ते खरे आंदोलन होते. महागड्या गाड्या घेऊन आंदोलनस्थळी जायचे, दिवसभर दुसऱ्यांच्या गाड्या जाळायच्या व रात्र झाली की उघडलेल्या हॉटेल्स-ढाब्यांवर जाऊन श्रमपरिहार करायचा, हे योग्य नाही.
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)