पत्रकार हा समाजाचा आरसा : सपोनि बल्लाळ

रहिमतपूर – पत्रकार हा समाजाचा आरसा असतो तो समाजातील चांगल्या आणि वाईट परंतू समाजाच्या बाजूने मांडण्याचा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पारदर्शक बातमीतूनच समाजातील सत्यता, असत्यता मांडण्याचा प्रयास असतो. त्यासाठी पत्रकारांनी तीनशे पासष्ट दिवस कार्यतत्पर राहावे, असे प्रतिपादन रहिमतपूर पोलिस स्टेशनचे सपोनि घनश्‍याम बल्लाळ यांनी केले.

रहिमतपूर पोलिस स्टेशनतर्फे पत्रकारांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम होते. जेष्ठ प्रकाश गायकवाड, प्रा. श्रीकांत बोधे, शशिकांत क्षीरसागर, संजय जंगम, राजेद्र पवार, जयदीप जाधव, प्रशांत आगेडकर, अमर माने, विकास गायकवाड, संदीप मोरे, इम्रान शेख, उदय गायकवाड, अभिजीत धोंगडे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सपोनि बल्लाळ म्हणाले, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांचा उल्लेख केला जातो. लेखणीच्या माध्यमातून समाजाला वाईट गोष्टीवर प्रकाश टाकण्याचे, तर चांगल्या कामाचे जाहीर कौतुक करण्याचे काम पत्रकार करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी सदस्यांचे काम कौतुकास्पद आहे. यापुढेही पत्रकारांनी निर्भिडपणे पत्रकारिता करावी, असे आवाहन त्यांनी केले. अविनाश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार सपोनि बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला. विजय जाधव यांची सहाय्यक फौजदार म्हणून बढती मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सचिन राठोड यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी रहिमतपूर पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)