पत्रकार शोएब इल्यासी निर्दोष

नवी दिल्ली: दूरचित्रवाणीवाहिनीवरील प्रख्यात अँकर व पत्रकार शोएब इल्यासी याची पत्नीच्या खुनाच्या आरोपावरून आज निर्दोष सुटका करण्यात आली. 18 वर्षापुर्वी त्याने आपली पत्नी अंजू हिची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यात ट्रायल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती पण त्याने आपल्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे मात्र तो निर्दोष सुटला.

शोएब इल्यासी हा दूरचित्रवाणीवाहिनीवरील इंडियाज मोस्ट वॉंटेड या मालिकेमुळे चांगलाच लोकप्रिय झाला होता. ही मालिका गुन्हेगारी क्षेत्रातील घटनांवर आधारीत होती. व ती शोएबच्या शैलीदार निवेदनामुळे चांगलीच गाजली होती. तथापी त्यालाच पोलिसांनी पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्याबद्दल अटक केल्यानंतर ती बातमी देशभर गाजली होती. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला 20 डिसेंबर 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)