पत्रकार शुजात बुखारींच्या मारेकऱ्यांमध्ये एक पाकिस्तानी

नवी दिल्ली : ‘रायझिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात जम्मू- काश्मीर पोलिसांना यश आले आहे. तीन पैकी दोन मारेकरी हे दक्षिण काश्मीरचे तर तिसरा मारेकरी हा पाकिस्तानचा असल्याची माहिती जम्मू- काश्मीर पोलीस दलातील सूत्रांनी दिली.

शुजात बुखारी यांची ईदच्या दोन दिवस अगोदर हत्या झाली होती. ‘प्रेस एनक्लेव’ या वृत्तपत्राच्या कार्यालयातील काम आटपून कारमध्ये बसत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बुखारी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. के. विर्दी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनेचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार तिन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यातील दोन हल्लेखोर हे दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी असून तिसरा मारेकरी हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव अबू हंजाला उर्फ नावेद असून तो ‘लष्कर- ए- तोयबा’चा दहशतवादी आहे. अबू हंजाला हा काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता. त्याला २६ ऑगस्ट २०१४ रोजी अटक झाली होती. पाकिस्तानस्थित एका ब्लॉगरचीही ओळख पटवण्यात आली असून त्याने बुखारी यांच्याविरोधात एक मोहीमच सुरु केली होती. संबंधित ब्लॉगर हा दहशतवादीच असून तो मूळचा श्रीनगरचा आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)