पत्रकार मारहाणप्रकरणी भाजप खासदाराच्या मुलाला अटक

रायपूर – छत्तिसगढमध्ये पत्रकाराला मारहाण केल्याबद्दल भाजप खासदाराच्या मुलाला अटक करण्यात आली. पत्रकाराच्या आई-वडिलांनाही मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एका रायपूूरस्थित हिंदी वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार राजेशप्रसाद गुप्ता यांनी एका सरकारी योजनेतील अनियमिततेविषयीची बातमी दिली. त्यामुळे चिडलेले देवेंद्रसिंह मरवी (वय 32) आणि त्याचा मित्र शिवव्रत सिंह हे दोघे 25 जूनला गुप्तांच्या घरात शिरले. त्यांनी गुप्ता यांना मारहाण केली.

यावेळी मध्ये पडल्याने गुप्ता यांच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली. गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवेंद्र आणि शिवव्रतला मंगळवारी रात्री पोलिसांकडून अटक करण्यात आली. देवेंद्र हा भाजपचे खासदार कमलभानसिंह मरवी यांचा मुलगा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)