पत्रकार महिलेबाबत अनुदार काढल्याने सोमनाथ भारतीविरोधात गुन्हा 

नोयडा: पत्रकार महिलेविरोधात अनुद्गार काढल्याबद्दल आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकार महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारती यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

भारती यांनी आपले नाव उच्चारून देहविक्रय करण्याची सूचना केली होती, अशी तक्रार या पत्रकार महिलेने केली. टिव्ही चॅनेलवरील चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान भारती यांनी या निवेदिकेस उद्देशून “भाजपची एजंट’ असल्याचे संबोधले आणि वेश्‍याव्यवसाय करण्याची सूचना केली होती, असे पोलिसांकडे दाखल तक्रारीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित चॅनेल आणि निवेदिका या दोघांवरही बदनामीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

-Ads-

वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमामध्ये आपण फोनद्वारे सहभागी झालो होतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी झालेल्या हल्ल्याबाबत या कार्यक्रमात चर्चा होत होती. मात्र त्यावेळी दाखवण्यात येत असलेल्या व्हिडीओमध्ये छेडछाड झाली होती, असे भारती यांनी म्हटले आहे. चॅनेलच्या निवेदिकेने केलेल्या तक्रारीनुसार नोएडामधील महिला पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)