पत्रकार भवनाचा प्रश्‍न मार्गी लावणार

मुख्याधिकारी औंधकर : रहिमतपूरमध्ये पत्रकार दिन उत्साहात

रहिमतपूर – पत्रकारांसाठी लवकरच सुसज्ज पत्रकार भवन उभारणार असून त्यासाठी पत्रकारांचे सहकार्य हवे आहे, असे प्रतिपादन रहिमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले. रहिमतपूर नगरपालिकेतर्फे पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदराव कोरे, उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, नगरसेवक शशिकांत भोसले, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, दीपक नाईक, रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, संजय जंगम, जयदीप जाधव, राजेंद्र पवार, संदीप मोरे, अमर माने, प्रशांत आगेडकर, प्रा. श्रीकांत बोधे, उदय गायकवाड, प्रकाश गायकवाड, इम्रान शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विनायक औंधकर म्हणाले, पत्रकारांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानाच्या उत्कृष्ट वृत्ताकन करुन पालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला. यापुढेही बातम्या देऊन सहकार्य करावे. पत्रकारांचे नेहमीच पत्रकारांची कार्याची दखल घेऊन लवकरच सर्व सोयीनीयुक्त असे सुसज्ज पत्रकार भवन उभे करू पण आपल्या सर्व पत्रकारांकडून सहकार्य हवे आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, जयदीप जाधव यांनी प्रलंबित प्रश्‍न, पत्रकार भवन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी केली. पत्रकार भवनासाठी वेळोवेळी मागणी करूनही ते भिजत घोंगडे राहिले आहे. यावेळी पत्रकारांचा नगराध्यक्ष आनंदराव कोरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आनंदराव कोरे यांनी केले. विद्याधर बाजारे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)