“पत्रकारितेतील संवेदनशिलता जपायला हवी’

कराड – सोशल मिडियाचा वाढता वेग लक्षात घेता आज एकमेकांमधील संवाद लोप पावत चालला आहे. पत्रकारिता करताना लोकाभिमुख काम करण्याची वेळ असून पत्रकारितेतील संवेदनशिलता संपली असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पत्की यांनी व्यक्त केली. सद्‌गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारितेपुढील कर्तव्ये व आव्हाने या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मॅनेजिंग कौन्सील सदस्य ऍड. रवींद्र पवार, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्रा. अशोक चव्हाण, सतीश मोरे, देवदास मुळे, डॉ. रमेश पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्की म्हणाले, सोशल मिडीया झपाट्याने वाढत असला तरी आजही लोकांचा प्रिंट मीडियावर विश्वास आहे. पत्रकारांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन काम करावे, भांडवलीकरण येतच आहे. यासाठी चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकून लोकाभिमुख काम करण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे. जागा व वेळ विक्रीसाठी काढली आहे, हे कोणीही नाकारु शकणार नाही. आज तंत्र आहे मात्र त्याचे ज्ञान अवगत करण्याची गरज आहे. आज आपण संवेदनशिलता हरवून बसलो आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असायला हवे. चॅनेलवरील गोष्टी आपण आपल्या जीवनात आणत आहे, ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक पत्रकाराला दोन ओळीतील अंतर वाचता आले पाहिजे. प्रबोधनामध्ये व्यवहार आला नाही पाहिजे, आज घराघरात, समाजात संवाद हरपत चालला आहे. संवादातून सुसंवाद साधण्याचे कर्तव्य पत्रकारांची पार पाडले पाहिजे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. रमेश पोळ यांनी केले. आभार प्रदीप नलवडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)