पत्रकारिता हा सजाजाचा आरसा – जाधव

भिगवण- पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. विधायक पत्रकारिता ही समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाते, असे मत पंचायत समितीचमाजी सभापती रमेश जाधव यांनी व्यक्‍त केले. भिगवण येथील कला महाविद्यालयांमध्ये “पत्रकार होताना’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा व पत्रकारदिनाच्या निमित्ताने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सन्मान सोहळ्यासाठी भिगवण व परिसरातील पत्रकार तर कार्यशाळेसाठी सुमारे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यशाळेचे उद्‌घाटन जाधव यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकार भरत मल्लाव, दादा थोरात, विक्रम शेलार, अमोल कांबळे, सुरेश पिसाळ, काशीनाथ सोलनकर, नितीन चितळकर, नानासाहेब मारकड, तुषार हगारे, संतोष सोनवणे, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, भैरवनाथचे मुख्याध्यापक अशोक बंदीष्टी उपस्थित होते. डॉ. काशीनाथ सोलनकर म्हणाले, जाहिरात, साहित्य लेखन, छायाचित्रण, शुद्धलेखन आदी क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तरुणांनी आवश्‍यक ते ज्ञान घेतल्यास त्यांचे करियर होऊ शकते. कार्यशाळेसाठी प्रा. पद्ममाकर गाडेकर, सुरेश शिंदे, अतुल गाडे, गणेश जाधव यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे, सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले तर प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)