संगमनेर – कोणत्याही माध्यमातील पत्रकारिता हे अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करताना पत्रकारितेतील नैतिकता जपत उत्तुंग भरारी घेण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत, संगमनेर महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते.
प्रसार माध्यमातील पत्रकारितेचे विविध आयाम अभ्यासलेल्या प्रशिक्षीत पत्रकारांवर या माध्यमाची विश्वासार्हता, या व्यवसायातील नीतीमुल्ये जपण्याची नैतिक जबाबदारी असते. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, सर्वसामान्याना न्याय देण्याची खुणगाठ मनाशी बांधून, प्रामाणिकपणे या क्षेत्रात प्रवेश केल्यास कोणतीही बाब अशक्‍य नाही. कष्ट करण्याची तयारी व मानसिकता असल्यास हमखास यश मिळतेच. पत्रकारिते बरोबरच मराठी भाषेची विविध कौशल्ये, वैशिष्ट्‌ये, वापर, प्रसार माध्यमांचे कायदे अभ्यासल्याने, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी या प्रत्येकामध्ये विशिष्ट गुणवैशिष्ट्‌ये आहेत. सर्वांना भावी आयुष्यात ही शिदोरी उपयोगी पडणार आहे.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. खेडलेकर यांचा सपत्नीक सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलेल्या मनोगतातून पत्रकारितेतील बारकावे, शब्दांची पेरणी, नैतिक मूल्ये, विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटी आदी अनेक गोष्टी वर्षभर शिकायला मिळाल्याबद्दल विदयार्थ्यांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी आनंद गायकवाड, संतोष दिवे, सुनील दवंगे, संपत कोंडार, गणेश सांगळे, संदीप सातपुते, सोमनाथ वाजे, ज्ञानदेव बुळे, साईकिरण कडुस्कर, हेमंत पोटे, मच्छिंद्र यादव, मंजाबापू साळवे, स्वप्निल रणखांबे, शुभांगी लंके, सुचिता कुलकर्णी, कीर्ती विटेकर,मंगेश मेघे, दत्ता पगार, अमोल वाघमारे, भूपाल शेळके,राजेश बोरुडे, नीलिमा घाडगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष दिवे यांनी केले. आभार अमित भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)