पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देणार्‍या प्रवृत्तीचा कराडात निषेध

कराड दि. 5 (प्रतिनिधी) -पत्रकार विकास जाधव यांना उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार शहाजी पाटील व रवींद्र पवार यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याचबरोबर अरेरावीची भाषा करत जाधव यांना एखाद्या आरोपी प्रमाणे वागणूक देण्यात आली. यासंदर्भात त्यांना तातडीने निलंबित करणात यावे या मागणीसाठी तालुक्यातील पत्रकारांनी निषेध मोर्चा काढला.
यावेळी हवालदार पाटील व पवार यांच्या निलंबनाचे निवेदन पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांना देण्यात आले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोखंडे, उपनिरीक्षक चौधरी उपस्थित होते. निवेदन देताना पत्रकार विकास जाधव यांनी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम उपस्थित पत्रकार व पोलिसांसमोर मांडला. यावेळी तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पराग शेणोलकर व सचिन शिंदे यांनी मोर्चाविषयीची भुमिका स्पष्ट करत निषेध व्यक्त केला. प्रा. अशोक चव्हाण, देवदास मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार अजिंक्य गोवेकर यांनी मानले.
यावेळी दोन दिवसात चौकशी करून अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)