पत्रकारांविरुद्धचा सामना पोलिसांनी जिंकला

करंजे- रोजचा ताणतणाव… सततची धावपळ.. यातून विरंगुळा मिळावा तसेच शारीरिक क्षमतेची पण माहिती व्हावी या हेतुने बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व वडगाव निंबाळकर पोलीस यांच्यात सोमेश्‍वरनगरातील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात आज (रविवारी) क्रिकेटचा सामना रंगला. या सामन्यात पोलिसांनी पत्रकार संघावर 18 धावानी विजय मिळविला. सामन्याच्या सुरुवातील पोलीस संघाने नाणेफेक जिंकून पोलिसांनी प्रथम फलंदाजी करीत 11 षटकांत पत्रकारांसमोर 124 धावांचे लक्ष्य ठेवले. यात पत्रकारांच्या गोलदांजीनी अनेक वॉईड चेंडू टाकून पोलिसांची धावसंख्या वाढवली. या धावांचा पाठलांग करताना पत्रकारांना 11 षटकांत 106 धावांच करता आल्याने त्यांना 18 धावांनी परभाव स्वीकारावा लागला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पत्रकार अमर वाघ तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण यांना गौरवण्यात आले. पोलीस संघात कर्णधार सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, नाईक शरद धेंडे, नाईक कल्याण खांडेकर, पोलीस कॉन्सटेबल हिरालाल खोमणे, ज्ञानेश्‍वर सानप, अक्षय सिताप, सुशांत पिसाळ, अमोल भुजबळ, नितीन साळवे, प्रतिक कांबळे. तर पत्रकार संघाचे कर्णधार संतोष शेंडकर, महेश जगताप, गणेश आळंदीकर, चिंतामणी क्षीरसागर, हेमंत गडकरी, अमर वाघ, युवराज खोमणे, विनोद गोलांडे, सोमनाथ लोणकर, संतोष भोसले, दत्ता माळशिकारे यांनी सहभाग घेतला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)