पत्रकारांनी न्याय भूमिकेतून कार्य करावे : बाळासाहेब भिलारे

सातारा : बाळासाहेब भिलारे मार्गदर्शन करताना शेजारी मान्यवर. (छाया ः अनिल वीर)

पाचगणी, दि. 9 (प्रतिनिधी) – लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून न्याय भूमिकेतून सकारात्मक कार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त महाबळेश्वर तालुक्‍यातील पत्रकारांचा सत्कार पंचायत समितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हा भिलारे (दादा) मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य तथा मधुसागर सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे व गटविकास अधिकारी घोलप आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब भिलारे म्हणाले, समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोहचविण्यासाठी राज्यकर्त्यांसह पत्रकारानी योगदान दिले पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय गायकवाड म्हणाले समाज जडणघडणीत पत्रकार निरपेक्षतेने काम करीत असल्याने यापुढे पत्रकार दिन दरवर्षी साजरा केला जाईल. विस्ताराधिकारी सुनील पार्टे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)