पत्रकारांचे 26 रोजी जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी)- पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेन्शन, छोटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे, अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि “मजिठिया’च्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व सर्व तहसील कार्यालयांसमोर सकाळी 11 वाजता अंदोलन करण्यात येणार आहे.आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करावी. 26 तारखेला छोट्या आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.

16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालावा. देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे केल जाणार दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.

-Ads-

सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. दहा तालुक्‍यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर त्या त्या तालुक्‍यातील तालुका पत्रकार संघाचे पत्रकार 11 वाजता आंदोलन करतील व तहसीलदारांना निवेदन देतील. सातारा शहर व सातारा तालुक्‍यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 वाजता आंदोलन करतील व जिल्हाधिकार्यांना निवेदन देतील. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनात उतरावे, से आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)